दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. ‘इंद्रप्रस्थ’ नाव केल्याने या शहराचे प्राचीन इतिहास आणि संस्कृतीशी नाते पुन्हा जोडता येईल, अशी पुस्तीही विश्व हिंदू परिषदेने केली.
दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी
दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. ‘इंद्रप्रस्थ’ नाव केल्याने या शहराचे प्राचीन इतिहास आणि संस्कृतीशी नाते पुन्हा जोडता येईल, अशी पुस्तीही विश्व हिंदू परिषदेने केली.

दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात, विहिंपच्या दिल्ली प्रांत विभागाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली रेल्वे स्थानकाचं नाव इंद्रप्रस्थ रेल्वे स्थानक आणि शाहजहानाबाद विकास मंडळाचं नाव इंद्रप्रस्थ विकास मंडळ करण्याचीही मागणी केली आहे.

राजधानीचे नाव बदलल्यानंतर तिचे नाव प्राचीन इतिहास आणि संस्कृतीशी जोडले जाईल,’ असे विहिंपचे दिल्ली प्रांत सचिव सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे.

‘नावं ही केवळ बदल नसतात; ती राष्ट्राच्या चेतनेचं प्रतिबिंब असतात. जेव्हा आपण ‘दिल्ली’ म्हणतो, तेव्हा आपण फक्त दोन हजार वर्षांचा काळ पाहतो. पण ‘इंद्रप्रस्थ’ म्हटलं की, आपण पाच हजार वर्षांच्या गौरवशाली इतिहासाशी जोडले जातो,’ असं विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

गुप्ता यांनी मागणी केली की, दिल्लीतील हेरिटेज वॉकमध्ये हिंदू राजांच्या किल्ले, मंदिरे आणि स्मारकांचाही समावेश व्हावा, जेणेकरून शहराच्या इतिहासाचं संतुलित चित्र उभं राहील. त्यामुळे सध्याच्या पिढीला भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत मिळेल.

त्यांनी पुढे मागणी केली की, दिल्लीमध्ये राजा हेमचंद्र विक्रमादित्य यांच्या नावाने एक ‘भव्य स्मारक’ तसेच ‘राजा हेमचंद्र विक्रमादित्य लष्करी शाळा’ स्थापन करण्यात यावी.

logo
marathi.freepressjournal.in