मतचोरी हे देशविरोधी कृत्य! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदनानंतर वापरलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी येत असून त्याबाबत मीडियात आलेल्या वृत्ताची लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दखल घेत ते वृत्त एक्सवर शेअर केले.
राहुल गांधी
राहुल गांधी संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदनानंतर वापरलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी येत असून त्याबाबत मीडियात आलेल्या वृत्ताची लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दखल घेत ते वृत्त एक्सवर शेअर केले. निवडणूक आयोगाकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, त्यामुळेच लोकांचा आपल्या लोकशाहीवरील विश्वास ढासळला आहे, मतचोरी हे देशविरोधी कृत्य आहे, असे राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले. मतदानाचा दिवस शाईमुळे चर्चेत राहिला. बोटावरची मार्करची शाई काही सहज उपलब्ध असलेल्या केमिकल्समुळे पुसली जात असल्याच्या तक्रारी गुरूवारी दिवसभर मतदारांकडून येत होत्या. शाई पुसण्याचे अनेक फोटो व व्हिडीओ मतदार सोशल मीडियावर शेअर करत होते. यामुळे बोगस व दुबार मतदानाची भीती राजकीय पक्षांकडून वर्तवली गेली.

मुख्यमंत्र्यांनी दावे फेटाळले

दरम्यान, राज्यातील महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानादरम्यान एसीटोनसारख्या रसायनांचा वापर करून शाई कशी काढता येते हे दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in