'या' तारखांना होणार त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुका

दिवंगत मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या विधानसभा मतदारसंघातील दोन पोटनिवडणुकांची देखील तारीख जाहीर
'या' तारखांना होणार त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुका

ईशान्य भारतामधील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभेच्या निवडणुकांची तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी तर मेघालय आणि नागालॅंडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांचा निकाल २ मार्चला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत दिली.

कसबापेठ मतदारसंघातील मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, पिंपरी चिंचवड मतदारसंघातील लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून २ मार्चला याचा निकाल समोर येणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, ३१ जानेवारीला निवडणूकीसाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसेच, ७ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर, १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in