
गुजरातमधील प्रसिद्ध वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हॅमरेजमुळे देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेली अनेक दिवस ते व्हेंडिलेटवर होते. १५ ऑक्टोंबर रोजी बाहेर पडले असताना त्यांचा अपघात झाला. देसाई हे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.
या अपघातानंतर देसाई यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार देसाई यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसंच निधन होण्यापूर्वी सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. रविवारी संध्याकाळी देसाई यांनी आपला देह ठेवला.
कोण होते पराग देसाई
पराग देसाई हे वाघ बकरी चहा कंपनीत कार्यकारी संचालक या पदावर होते. ते चहा समूहाचे चौथ्या पिढितील उद्योजग हगोते. समूहाच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचं नेतृत्व करण्याबरोबर त्यांनी ब्रँडला एक वेगळ्या उंचीवर नेलं. १९ साली ते वाघ बकरी चरामध्ये रुजू झाले. त्यावेळी कंपनीची एकूण उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा कमी होती. आजच्या घडीला या कंपनीची वार्षिक उलाढाल २,००० कोटींच्या पुढे गेली आहे. वाग बकरी चहा भारतातील २४ राज्यांसह जगातील ६० देशांमध्ये निर्यात केली जाते.