हरित निवडणुकीसाठी ‘वॉक टू व्होट’चे आवाहन; पुद्दुचेरीतील निवडणूक विभागाची आगळी संकल्पना

जनजागृतीसाठी निवडणूक विभाग आणि एका खाजगी संस्थेने संयुक्तपणे काढलेल्या सायकल रॅलीतील सहभागींसमोर बोलताना त्यांनी ही संक्लपना मांजली. ते म्हणाले की केंद्रशासित प्रदेशात एकेरी वापराचे प्लास्टिक टाळले जाईल.
हरित निवडणुकीसाठी ‘वॉक टू व्होट’चे आवाहन; पुद्दुचेरीतील निवडणूक विभागाची आगळी संकल्पना
Published on

पुद्दुचेरी : मतदारांना 'कार्बन न्यूट्रॅलिटी' आणि 'ग्रीन इलेक्शन'चे ध्येय पुढे नेण्यासाठी कार किंवा दुचाकी यांचा वापर करण्यास टाळण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी ए. कुलोथुंगन यांनी केले आहे. १९ एप्रिलला मतदानासाठी जाऊन मतदानाचा हक्क बजावाव पण त्याचबरोबर 'वॉक टू व्होट' (मतदानासाठी चाला) ही संकल्पना अंमलात आणावी, तसे झाल्यास हा प्रयत्न संपूर्ण देशासाठी एक आगळा आदर्श ठरू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

जनजागृतीसाठी निवडणूक विभाग आणि एका खाजगी संस्थेने संयुक्तपणे काढलेल्या सायकल रॅलीतील सहभागींसमोर बोलताना त्यांनी ही संक्लपना मांजली. ते म्हणाले की केंद्रशासित प्रदेशात एकेरी वापराचे प्लास्टिक टाळले जाईल. उच्च कार्बन फूटप्रिंट मटेरियल असलेल्या फ्लेक्स किंवा सिंथेटिक वापरणाऱ्या निवडणुकीशी संबंधित प्रचार बॅनरला परवानगी दिली जाणार नाही.

येथील निवडणूक विभागाने 'वॉक टू व्होट' ही थीम अधोरेखित करण्यासाठी खास लोगोची रचना केली आहे आणि पहिल्यांदाच सुमारे ५०० महिला मतदारांच्या उपस्थितीत हा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला. अधिकृत सूत्राने सांगितले की, मतदानाच्या दिवशी (१९ एप्रिल) 'वॉक टू व्होट' धोरण स्वीकारणाऱ्या मतदारांची संख्या निश्चित करण्यासाठी नमुना सर्वेक्षण केले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in