उत्तर प्रदेशातील डॉक्टरच्या हत्येतील वॉण्टेड शूटरला अटक

चौकशीत त्याने उत्तरप्रदेशातील एका डॉक्टरची हत्या केल्याची कबुली दिली.
उत्तर प्रदेशातील डॉक्टरच्या हत्येतील वॉण्टेड शूटरला अटक
Published on

मुंबई : जानेवारी महिन्यांत उत्तर प्रदेशच्या साई क्लिनिकमध्ये झोपेत असलेल्या तिलकधारी पटेल या डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करून पळून गेलेल्या वॉण्टेड शूटरला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मंगेशकुमार संग्राम यादव असे या शूटरचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन राऊंड जप्त केले आहेत. वांद्रे येथे काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर रंगशारदा हॉटेलसमोरील ॲॅप्को कन्स्ट्रक्शन साईटसमोरून मंगेशकुमार यादव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन राऊंड सापडले. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने उत्तरप्रदेशातील एका डॉक्टरची हत्या केल्याची कबुली दिली. लवकरच त्याचा ताबा उत्तरप्रदेश पोलिसांना देण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in