खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचे पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगने अखेर आत्मसमर्पण केले
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचे पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Published on

गेले काही दिवस खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा शोध सुरु होता. यानंतर अखेर त्याने पंजाब पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. तो १८ मार्चपासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांकडून देशभरात विशेष मोहिम राबवण्यात आली होती. अखेर पोलिसांना यश आले असून पुढील कारवाई सुरु आहे.

शनिवारी अमृतपालने स्वतः मोगा येथील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सकाळी ७ वाजता रोडे गावातील गुरुद्वाराजवळून ताब्यात घेतले. तो आत्मसमर्पण करणार असल्याचे फोन करून पोलिसांना सांगितले होते. त्याने आत्मसमर्पण करण्यापूर्वी गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केल्याचेही सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, त्याची पत्नी किरणदीप कौरलाही पंजाब पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून अटक केली होती. ती लंडनला पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्याच्या सहकारी आणि कुटुंबियांना याआधी पंजाब पोलिसांनी अटक केली असून सर्वांची चौकशी सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in