टॉमॅटो प्रश्नी स्मृती इराणी भडकल्या, पत्रकार सुधीर चौधरींना करुन दिली जेलवारीची आठवण ; व्हिडिओ व्हायरल

जेव्हा टॉमॅटोचे दर २५०-३०० रुपये झाले होते तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न इराणी यांना विचारण्यात आला होता.
टॉमॅटो प्रश्नी स्मृती इराणी भडकल्या, पत्रकार सुधीर चौधरींना करुन दिली जेलवारीची आठवण ; व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून टॉमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले होते. आता ते काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी टॉमॅटो २५०-३०० रुपये किलोने विकले जात होते. यावर अनेक प्रतिक्रिया, मिम्स व्हायरल झाले होते. यावरुन एका हिंदी वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेलं उत्तर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे. तसंच त्यांच्या या उत्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

हिंदी वाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना जेव्हा टॉमॅटोचे दर २५०-३०० रुपये झाले होते तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला. यावर स्मृती इराणी यांनी संताप्त व्यक्त केला. त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न करत म्हणाल्या की, "सुधीरजी जेव्हा तुम्ही तुरुंगात होता, तेव्हा काय झालं होतं?असं मी देखील तुम्हाला विचारु शकते." टॉमॅटोच्या दरांवर प्रश्न विचारण हा खासगी प्रश्न असल्याचं इराणी यांनी सांगितलं.

या मुलाखतीचा व्हिडिओची ती क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पत्रकार सुधीर चौधरी हे 'आज तक जी-२० समिट' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्मृती इराणी यांची मुलाखत घेत होते. यावेळी हा प्रकार घडला. ही काही सेकंदाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुधीर चौधरी यांचं जेल प्रकरण नेमकं काय ?

'द इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार २०१२ साली तत्कालीन 'झी न्यूज'चे संपादक सुधीर चौधरी आणि 'झी बिझनेस'चे संपादक समीर अहलुवालिया यांच्यावर लाचखोरी प्रकणात कारवाई करण्यात आली होती. या दोघांना याप्रकरणी २० दिवस तुरुंगवास देखील भोगावा लागाल होता. काँग्रेसचे माजी खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौधरी आणि अहलुवालिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोघांनी जिंदल कंपनीकडे १०० कोटींची खंडणी मागण्याचा मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणातचा दाखल देत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टॉमॅटो दरवाढीवर प्रश्न विचारला असता, संताप व्यक्त करत सुधीर चौधरी यांच्या तरुंगवासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in