एकांतात पॉर्न बघणे गुन्हा नाही ;केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू शकत नाही
एकांतात पॉर्न बघणे गुन्हा नाही ;केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

थिरुअनंतपुरम : गुपचूप, एकांतात पॉर्न बघणे अश्लिलतेचा गुन्हा नाही. असे सांगून केरळ उच्च न्यायालयाने एका व्यक्तीविरोधात सुरू असलेली कारवाई रद्द केली.

ही व्यक्ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ बघत होती. तेव्हा रस्त्यावर पोलिसांनी तिला अटक केली. याविरोधात त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली. केरळ उच्च न्यायालयाचे न्या. पी. व्ही. कुन्हिकृष्णन म्हणाले की, एकांतात पॉर्न व्हिडीओ बघणे हे अश्लिलतेच्या गुन्ह्यात मोडत नाही. कोणीही व्यक्ती वैयक्तिक स्तरावर अश्लील व्हिडीओ पाहत असेल, मात्र तो दुसऱ्यांना पाठवत नसेल किंवा सर्वांसमोर तो पाहत नसल्यास ते भारतीय दंडसंहितेच्या अश्लिलतेच्या गुन्ह्यात मोडत नाही. पॉर्न पाहणे ही व्यक्तीची वैयक्तिक पसंती असू शकते. न्यायालय त्यांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in