आर्थिक मंदीच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने ४० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सांगण्यात आले की, त्यांना ४५ दिवसांचा पगार दिला जाईल, त्यांना यापुढे कामावर जाण्याची गरज नाही.
वझीरएक्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जगातील सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रिप्टो बाजार मंदीतून जात आहे. भारतीय क्रिप्टो बाजार कर, नियमन आणि बँकिंगशी संबंधित आव्हानांना तोंड देत आहे. या परिस्थितीत सर्व भारतीय क्रिप्टो एक्स्चेंजचे प्रमाण नाटकीयरित्या कमी झाले आहे. काही काळापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांनी क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सलाही मनी लाँड्रिंग प्रकरणी तपासात घेतले होते.
गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यापूर्वी, भारतातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने जागतिक स्तरावर आपल्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काढून टाकलेल्या या कर्मचाऱ्यांचा शेवटचा कामाचा दिवस ३० सप्टेंबर होता.
यूएस मार्केटमध्ये मंदीच्या भीतीने, फेसबुकची मूळ कंपनी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी साप्ताहिक प्रश्नोत्तर सत्रात कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की मेटामध्ये नवीन नियुक्ती थांबवली जात आहे आणि आणखी नोकरकपात केली जाईल. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, झुकरबर्गने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, बहुतांश टीम्सचे बजेटही कमी केले जाईल. राइडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी ओला देखील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे. कंपनीने आपल्या दोन हजार अभियंतांपैकी सुमारे दहा टक्के अभियंत्यांना कंपनी सोडण्यास सांगितले आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टनेही मंदीच्या बातम्यांदरम्यान दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अलीबाबाने दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत ९,२४१हून अधिक कर्मचाऱ्यांनी हँगझो-आधारित अलीबाबा सोडले, कारण कंपनीने त्यांचे एकूण कर्मचारी ,२४५,७००पर्यंत कमी केले.