दिल्लीच्या प्रदुषणास आम्ही जबाबदार नाही!पंजाबच्या शेतकऱ्यांनी फेटाळले आरोप

सरकारने शेतकचरा व्यवस्थापन पुरेसे आणि योग्य प्रकारे करण्यास सहकार्य केल्यानंतरच शेतकचरा जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवार्इ योग्य ठरेल
दिल्लीच्या प्रदुषणास आम्ही जबाबदार नाही!पंजाबच्या शेतकऱ्यांनी फेटाळले आरोप

जाल खंबाटा/नवी दिल्ली: दिल्लीतील प्रदूषण पंजाबमध्ये शेतकचरा जाळल्यामुळे होत नसून तेथील उद्योगधंदे आणि वाहनांमुळेच हवा खराब होत असल्याचे सांगत पंजाबमधील शेतकरी नेत्यांनी या प्रकरणी आपली जबाबदारी फेटाळली आहे. तसेच सरकारने मका आणि कडधान्यांसारख्या पर्यायी पिकांनाही किमान हमी भाव द्यावा, जेणेकरुन पाणी खाणारे भात पीक घेण्याचे शेतकरी टाळतील, अशी मागणी देखील पंजाबी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

शेतकरी शेतकचरा जाळतात म्हणूनच हवाप्रदूषण होते, यावर टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना खलनायक बनवले जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांनी दिल्लीतील प्रदूषण कारखाने आणि मोटरींमुळे होत असल्याचे सांगून आपले हात झटकले आहेत. न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशु धुलिया यांच्या खंडपीठाने शेतकचरा जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव देऊ नये, अशी टिप्पणी केली आहे. भारतीय किशन युनियनचे महासचिव सुखदेवसिंग कोक्रीकलान यांनी शेतकचरा व्यवस्थापनासाठी ना केंद्र सरकार, ना राज्य सरकार लक्ष देत आहे, असे म्हटले आहे.

केवळ शेतकचरा व्यवस्थापनासाठी मशिनरी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून चालणार नाही तर आता भात शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक आर्थिक मदतीची गरज आहे, असे कोरकीकालन यांनी सांगितले. ते स्पष्ट म्हणाले की, दिल्लीतील प्रदूषण आणि पंजाब यांचा काहीही संबंध नाही. पंजाबमध्ये शेतकचरा जाळला असता पंजाबधील हवा दिल्लीपेक्षा शुद्ध, असे का, असा उलट सवाल देखील त्यांनी केला. सरकारने शेतकचरा व्यवस्थापन पुरेसे आणि योग्य प्रकारे करण्यास सहकार्य केल्यानंतरच शेतकचरा जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवार्इ योग्य ठरेल, अशी सूचना देखील पंजाबी शेतकरी नेत्यांनी केली आहे. सरकार योग्य उपायोजना करु शकत नसेल तर शेतकऱ्यांवर ठपका ठेवणे योग्य ठरणार नाही, असेही शेतकरी नेते कोक्रिलान म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in