उत्तराखंड बोगदा दुर्घटनेशी आमचा कुठलाही संबंध नाही; व्हायरल बातम्यांवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

अदानी समूहाकडून आज एक निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण देण्यात आला आहे.
उत्तराखंड बोगदा दुर्घटनेशी आमचा कुठलाही संबंध नाही; व्हायरल बातम्यांवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ४१ कामगार अडकून पडले आहेत. या कामगारांच्या सुखरुप सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. असं असताना या दुर्घटनेशी आदानी समूहाचं नाव जोडण्यात येत आहे. यावर अदानी समूहाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बोगद्याच्या बांधकामात अदानी समूहाचा किंवा आमचा कोणत्याही उपकंपनीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही, असं अदानी समूहाकडून सांगण्यात आलं आहे.

बोगदा तयार करणारी कंपनी अदानी समूहाची आहे. अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाकडून आज एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यात, "आमच्या निदर्शनास आलं आहे की, उत्तराखंडमध्ये बोगदा कोसळलेल्या घटनेशी आमजा संबंध जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. तसंच आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, बोगद्याच्या बांधकामात अदानी समूह किंवा आमच्या कोणत्याही उपकंपन्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. बोगद्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कंपनीत आमचे कोणतेही शेअर्स नाहीत", असं स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आलं आहे.

माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन बोगद्याच्या बांधकामाचा संबंध अदानी समूहाशी जोडला होता. उत्तराखंडमधील बोगदा कोणत्या खासगी कंपनीने बांधला? त्या कंपनीचे भागधारक कोण आहेत? अदानी ग्रुप त्यापैकी एक आहे का? मी फक्त विचारत आहे, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळली आणि त्यात काम करणारे ४१ कामगार आतमध्ये अडकले. या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेश अंतिम टप्य्यात आलं आहे. मात्र, खोदकाम सुरु असतानाच झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बचावकार्यास वेळ लागत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in