सुशिक्षित सज्जन पंतप्रधान हवा ; आपच्या प्रिती शर्मा-मेनन यांचा मोदींवर हल्लाबोल

भाजप सरकार कान बंद करून सगळा तमाशा बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काही भाष्य करत नसून...
सुशिक्षित सज्जन पंतप्रधान हवा ; आपच्या प्रिती शर्मा-मेनन यांचा मोदींवर हल्लाबोल

कुस्तीपटुंवरील अन्यायाविरोधात महिला कुस्तीपटुंचे उपोषण दिल्लीत सुरू आहे; मात्र केंद्रात बसलेले भाजप सरकार कान बंद करून सगळा तमाशा बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काही भाष्य करत नसून अशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही. ते फक्त एक अहंकारी माणूस आहेत, जे देशासाठी अत्यंत घातक आहे. यासाठी आम आदमी पार्टीची मागणी आहे की, एक सुशिक्षित सज्जन पंतप्रधान हवा, एक अनपढ पंतप्रधान नको, अशा तिखट व बोचऱ्या शब्दांत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून, हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे राज्य आहे. अखंड महाराष्ट्र व्हावा, यासाठी हजारों हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काहीही झाले तरी आपला महाराष्ट्र ताठ मानेने उभा राहायला हवा, असे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला वाटते. महाराष्ट्र हे आदर्श राज्य आहे आणि या आदर्शांना वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रात सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, महाराष्ट्रातील सध्याचे जे शिंदे-फडणवीस सरकार आहे, हे महाराष्ट्रविरोधी सरकार आहे. बारसू असो किंवा आरे असो प्रत्येक ठिकाणी जनतेची पिळवणूक सुरू आहे, अशी टीका प्रिती शर्मा-मेनन यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी देवाजवळ एकच प्रार्थना आहे की, महाराष्ट्रामध्ये असे सरकार हवे आहे, जे लोकांसाठी आणि लोकांबरोबर काम करेल. याच गोष्टीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे, अशा शब्दांत प्रीती शर्मा-मेनन यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार टीका केली. आम आदमी पार्टी मुंबईतर्फे १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बोरिवली पश्चिम येथे 'सांस्कृतिक यात्रेचे' आयोजन करण्यात आले होते आणि तदनंतर 'सांस्कृतिक संमेलनाचे'आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in