आम्हाला कोंढलं नाय, मारलं नाय, हाणलं नाय शहाजीबापूंची पुन्हा डायलॅागबाजी

आम्ही ४० आमदारांनी मिळून एकजुटीने, विचार करून एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला आणले आहे
 आम्हाला कोंढलं नाय, मारलं नाय, हाणलं नाय  शहाजीबापूंची पुन्हा डायलॅागबाजी

काय ती झाडी, काय ते डोंगूर, काय ते हाटील,’ अशा शब्दात कार्यकर्त्याशी संवाद साधणारे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील एका रात्रीत सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. मात्र गुवाहाटीमध्ये त्यांना मारहाण होत असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला त्यांनीच पूर्णविराम दिला आहे. ‘‘आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सहवासात आहोत. आम्हाला कोणीही या ठिकाणी घेऊन आलं नाही, कोंढलं नाय, मारलं नाय, हाणलं नाय. अफवा पसरवू नका. आम्ही जे आलो आहेत, ते स्वखुशीने गुवाहाटीमध्ये आलो आहोत,’ असे शहाजीबापू यांनी सांगितले.

शहाजीबापू म्हणाले की, “आम्ही ४० आमदारांनी मिळून एकजुटीने, विचार करून एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला आणले आहे. आमच्या मतदारसंघातील जनता आणि आमचे आमच्या मतदारसंघातील भविष्यातील राजकारण वाचवा, अशी विनंती आम्ही शिंदे यांना केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचं राजकारण उद्‌ध्वस्त होतंय. आम्ही जनतेसमोर मते मागताना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन जनतेसमोर गेलो होतो. लोकांनी आम्हाला भरभरून मते दिली. २०१९च्या निवडणुकीत एक लाख मते घेत भाई गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा रोवला आणि मी विजयी झालो.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in