Weather Update : हवामान खात्याचा निष्कर्ष कायम; पुन्हा शिक्कामोर्तब, यंदा पाऊस ९० टक्केच

भारतात ‘एल-निनो’ प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने पहिल्या अंदाजात व्यक्त केले होते.
Weather Update : हवामान खात्याचा निष्कर्ष कायम; पुन्हा शिक्कामोर्तब, यंदा पाऊस ९० टक्केच
Weather Update : हवामान खात्याचा निष्कर्ष कायम; पुन्हा शिक्कामोर्तब, यंदा पाऊस ९० टक्केचप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : भारतात ‘एल-निनो’ प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने पहिल्या अंदाजात व्यक्त केले होते. आता मे अखेरीच्या नवीन अंदाजात आपला पूर्वीचा निष्कर्ष कायम ठेवला आहे. त्यानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत होणारा नैऋत्य मोसमी (मान्सून) पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ यंदा पाऊस संकट राहणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पाऊस होणार आहे. यात ४ टक्के कमी-अधिक त्रुटी असू शकतात. या मान्सून हंगामात ईशान्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर देशाच्या उर्वरित भागांत मात्र सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.

१९७१ ते २०२० मधील आकडेवारीवर आधारित, संपूर्ण देशाची मिळून मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ टक्के आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात ठराविक कालावधीत नोंदवलेल्या पावसाची सरासरी असते, जी सहसा ३० ते ५० वर्षांच्या दीर्घ कालावधीची काढली जाते.

देशातील बहुतांश कोरडवाहू शेती क्षेत्राचा समावेश असलेल्या मुख्य मान्सून पट्ट्यात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यपेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे.

जूनमध्ये पाऊस कमी

जूनमध्ये संपूर्ण देशात सरासरी पाऊस सामान्यपेक्षा कमी म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. जर मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर हवामान विभाग त्याचे वर्गीकरण ‘अपुरा पाऊस’ असे करते.

महाराष्ट्रात जूनमध्ये उष्णतेच्या लाटा

हवामान विभागाने नमूद केले की, जूनमध्ये देशातील बहुतांश भागांत मासिक कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जूनमध्ये महाराष्ट्रातील काही ठराविक क्षेत्रांमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे, असे महापात्रा यांनी सांगितले.

राजस्थान आणि झारखंडमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असे महापात्रा म्हणाले.

मान्सून पाच दिवसांपासून अडकला

केरळममध्ये मान्सूनच्या आगमनाबद्दल बोलताना महापात्रा म्हणाले की, पुढील सात दिवसांत मान्सून दाखल होण्याची अपेक्षा आहे. केरळममध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला आहे. मान्सून गेल्या पाच दिवसांपासून केरळमच्या किनारपट्टीपासून ३० ते ३५ किमी अंतरावर अडकला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तो पुढे सरकण्याची शक्यता कमी आहे. १५ मे रोजी हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता की, मान्सून त्याच्या नेहमीच्या तारखेच्या म्हणजे १ जूनच्या पाच दिवस आधी, म्हणजेच २६ मे रोजी केरळममध्ये दाखल होईल. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी मान्सून ३ ते ४ जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली आहे. अंदमानमध्ये १६ मे रोजी मान्सून दाखल झाला होता.

जूनमध्ये ‘एल निनो’ कमजोर

जूनमध्ये ‘एल निनो’ स्थिती कमजोर राहण्याची शक्यता असून, सप्टेंबरमध्ये ती मध्यम ते तीव्र राहू शकते. सध्या, प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात तटस्थ ‘एल निनो-दक्षिण दोलन’ स्थिती बदलून ‘एल निनो’च्या दिशेने जात आहे. ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाल्यामुळे देशात मान्सूनचा पाऊस कमी होतो.

logo
marathi.freepressjournal.in