कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी बंगाली स्थलांतरितांवरील कथित अत्याचारांशी संबंधित सरकारी ठरावावरील चर्चेदरम्यान गोंधळ झाला आणि त्याचे पर्यवसान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सभागृहातच फ्री स्टाईल हाणामारी होण्यात झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठरावावर बोलणार इतक्यात भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
या प्रकारामुळे सभागृहात मार्शल बोलवण्यात आले. त्यातच भाजपा आमदार शंकर घोष यांना निलंबित करण्यात आले. यादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.