राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन नाही; पश्चिम बंगाल सरकारने केंद्राला पाठविला अहवाल

राष्ट्रपतींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात शिष्टाचाराचे गंभीर उल्लंघन झाल्याच्या आरोपांवरून केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे. त्याबाबत राज्य सचिवालयातून रविवारी संध्याकाळी निर्धारित मुदतीत केंद्रीय गृह मंत्रालयाला एक सविस्तर अहवाल पाठवला आहे.
राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन नाही; पश्चिम बंगाल सरकारने केंद्राला पाठविला अहवाल
राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन नाही; पश्चिम बंगाल सरकारने केंद्राला पाठविला अहवालसंग्रहित छायाचित्र
Published on

कोलकाता : राष्ट्रपतींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात शिष्टाचाराचे गंभीर उल्लंघन झाल्याच्या आरोपांवरून केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे. त्याबाबत राज्य सचिवालयातून रविवारी संध्याकाळी निर्धारित मुदतीत केंद्रीय गृह मंत्रालयाला एक सविस्तर अहवाल पाठवला आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती यांनी केंद्रीय गृह सचिवांना हा अहवाल सादर केला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुख्य सचिवांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात राष्ट्रपतींच्या भेटीबाबत राज्याने उचललेल्या प्रत्येक प्रशासकीय पावलाचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला का उपस्थित राहिल्या नाहीत, आंतरराष्ट्रीय आदिवासी आणि संथाल परिषदेचे ठिकाण का बदलावे लागले, याची कारणे आणि आधारभूत नोंदी या कागदपत्रात देण्यात आल्या आहेत. असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, संपूर्ण प्रक्रिया प्रस्थापित प्रशासकीय प्रोटोकॉलनुसार काटेकोरपणे पार पडली. याबाबतची सर्व संबंधित माहिती औपचारिकपणे केंद्राला कळवण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.

ममतांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, आज भाजपाने संविधानाला अशा ठिकाणी नेले आहे की, आम्हाला ते सांगायलाही लाज वाटते. आम्ही माननीय राष्ट्रपतींचा आदर करतो. त्यांना राजकारण विकण्यासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांना भाजपाचा अजेंडा घेऊन पाठवण्यात आले आहे. मला माफ करा मॅडम. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. पण तुम्ही भाजपच्या जाळ्यात अडकला आहात.

पंतप्रधानांच्या टीकेला ममता बॅनर्जींचे उत्तर

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री म्हणाले. आदिवासी समुदायातून येणाऱ्या राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या दुःखामुळे देशभरातील लोकांना खूप दुःख झाल्याचे मोदीं म्हणाले. पंतप्रधानांच्या टीकेनंतर, ममता बॅनर्जी यांनी रविवारी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रशासकीय कागदपत्रांची मालिका पोस्ट केली. तसेच घटनांचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. शिष्टाचार उल्लंघनाच्या आरोप फेटाळून लावले. राष्ट्रपती सिलिगुडीमध्ये आल्यानंतर, सिलिगुडीचे महापौर, दार्जिलिंगचे जिल्हा दंडाधिकारी आणि सिलिगुडीचे पोलीस आयुक्त यांनी शिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत केल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींनी कशामुळे नाराजी व्यक्त केली

सिलिगुडी येथील परिषदेदरम्यान राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील वादाला पुन्हा सुरुवात झाली. सभेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी यांनी निराशा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत. मीही पश्चिम बंगालची मुलगी आहे. मला बंगालच्या लोकांवर प्रेम आहे. कदाचित ममता नाराज असल्याने त्या स्वतः माझे स्वागत करण्यासाठी आल्या नाहीत. तसेच कोणताही मंत्रीही स्वागत करण्यासाठी आला नाही. राष्ट्रपतींच्या या या वक्तव्यानंतर भाजपाकडून पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. केंद्र सरकारनं या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांकडून तातडीने अहवाल मागितला.

logo
marathi.freepressjournal.in