पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा ; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता हायकोर्टाने नियुक्त्या रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी नकार दिला. मात्र...
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा ; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता हायकोर्टाने नियुक्त्या रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी नकार दिला. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांविरोधातील सीबीआय चौकशीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आता ६ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

पश्चिम बंगालमधील २५ हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्या. जे.बी पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना २०१६ साली झालेल्या २५,७५३ शिक्षकांच्या नियुक्त्यांमधील योग्य नियुक्त्यांबाबतचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का, अशी विचारणा केली.

कोलकाता हायकोर्टाने मुदत संपलेल्या पॅनेलने निवडलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले व या शिक्षकांनी पुढील चार आठवड्यात १२ टक्के वार्षिक व्याजदराने संपूर्ण वेतन परत करण्याचे आदेश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in