पश्चिम रेल्वे-मध्य रेल्वे जोडली जाणार; खांडवा यार्डच्या नूतनीकरणासाठी १० दिवसांचा ब्लॉक

मध्य रेल्वेमार्फत अकोला-रतलाम विभागातील गेज रूपांतरण व खांडवा यार्ड नूतनीकरणासाठी प्री-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे-मध्य रेल्वे जोडली जाणार; खांडवा यार्डच्या नूतनीकरणासाठी १० दिवसांचा ब्लॉक
Published on

मुंबई : मध्य रेल्वेमार्फत अकोला-रतलाम विभागातील गेज रूपांतरण व खांडवा यार्ड नूतनीकरणासाठी प्री-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे एकमेकांना जोडली जाणार आहे. १४ ते २४ जुलै या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक कालावधीत १४ जुलै रोजी रिवा-सीएसएमटी एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी, दादर-गोरखपूर, १५ जुलै रोजी सीएसएमटी-रिवा, मुंबई सेंट्रल-भुसावळ, भुसावळ-मुंबई सेंट्रल, रक्सौल-एलटीटी, दादर-बलिया, जबलपूर-सीएसएमटी, १६ जुलै रोजी सीएसएमटी-पाटणा, दादर-गोरखपूर, सीएसएमटी-जबलपूर, गोरखपूर-दादर, १७ जुलै रोजी एलटीटी-रक्सौल, बलिया-दादर, मुंबई सेंट्रल-भुसावळ, भुसावळ-मुंबई सेंट्रल, पाटणा-सीएसएमटी, दादर-बलिया, जबलपूर-सीएसएमटी, १८ जुलै रोजी दादर-गोरखपूर, सीएसएमटी-जबलपूर, गोरखपूर-दादर, १९ जुलै रोजी सीएसएमटी-पाटणा, एलटीटी-गोरखपूर, दादर-बलिया, बलिया-दादर, २० जुलै रोजी मुंबई सेंट्रल-भुसावळ, भुसावळ-मुंबई सेंट्रल, दादर-गोरखपूर, जबलपूर-सीएसएमटी, गोरखपूर-दादर, २१, २२, २३ आणि २४ जुलै रोजीही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in