‘पीडीए’साठी काय दिले? उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर अखिलेश यादव यांची टीका

उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर प्रश्न उपस्थित करत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी राज्य सरकारला विचारले की, त्यात ९० टक्के लोकांसाठी काय दिले आहे.
‘पीडीए’साठी काय दिले? उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर अखिलेश यादव यांची टीका
Published on

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर प्रश्न उपस्थित करत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी राज्य सरकारला विचारले की, त्यात ९० टक्के लोकांसाठी काय दिले आहे. जे पीडीए आहेत म्हणजे पिछडे, दलित आणि अल्पसंख्याक आहेत, त्या ९० टक्के लोकांसाठी काय दिले आहे, असा सवाल अखिलेश यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांचा असो वा ८ लाख कोटी रुपयांचा... ९० टक्के लोकांसाठी त्यात काय आहे हा प्रश्न उरतो, अशी विचारणा करीत एक्सवर अखिलेश यांनी एकंदर या अर्थसंकल्पाच्या फलितावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

पत्रकारांशी अर्थसकंल्पाबद्दल बोलताना अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर ताशेरे ओढले.

यादव म्हणाले की, वास्तविक भाजपचे धोरण सामान्य लोकविरोधी आहे, ते अर्थसंकल्पातील ९० टक्के रक्कम १० टक्के श्रीमंत लोकांसाठी ठेवते आणि केवळ १० टक्के बजेट ठेवते ते ९० टक्के गरजू लोकांसाठी. भाजप सरकारने आकड्यांमध्ये अडकू नये, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in