भारताच्या ताफ्यात नवे घातक ड्रोन सामील

एकाच उड्डाणात चीन-पाक सीमेची टेहाळणी करण्यास सक्षम
भारताच्या ताफ्यात नवे घातक ड्रोन सामील

नवी दिल्ली: भारतीय हवार्इ दलाच्या ताफ्यात हेरॉन मार्क-२ जातीचे चार नवे ड्रोन दाखल करण्यात आले असून ते एकदा उड्डाण केले की ३६ तास आकाशात घिरट्या घालू शकतात. यामुळे या ड्रोनने एकदा उड्डाण घेतले की तो चीन आणि पाक दोन्ही देशांची टेहाळणी करु शकणातर आहे. हे ड्रोन उत्तर क्षेत्रात हवार्इ क्षेत्राच्या आघाडीवर तैनात करण्यात आले आहेत. हेरॉन मार्क-२ ड्रोनच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या तुकडीस ‘वॉर्डन ऑफ द नॉर्थ’ नाव देण्यात आले आहे. या ड्रोनने चीन व पाक सीमांवर टेहाळणी सुरु केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in