
भारतामध्ये सर्वाधिक व्हॉट्सॲप (WhatsApp) युझर्स असतानादेखील सप्टेंबरमध्ये २६.८५ लाख अकाउंट्स बंद केले आहेत. व्हॉट्सॲप इंडियाने मासिक अहवाल जारी केला असून त्यामध्ये ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात कंपनीकडे ६६६ तक्रारी करण्यात आल्या. नवीन माहिती तंत्रज्ञान कायदा, २०२१च्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रार आणि निवारण विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर या अकाउंट्सवर बंदी घातल्याचे कंपनीने स्पष्ट केले. यूजर्सच्या सुरक्षा आणि गोपनियतेला प्राथमिकता देणे हा व्हॉट्सॲपचा प्रमुख उद्देश आहे, असे कंपनीने आपल्या अहवालात सांगितले आहे. यातील मेसेंजिंग सिस्टमचा दुरुपयोग थांबवण्यासाठी एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड बनवण्यात आलेले आहे.
व्हॉट्सॲपने भारतीय यूजर्सच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार आणि निवारण विभाग सुरू केला आहे. त्यामध्ये इंजिनिअर्स, टेक्निशियन, संशोधक, कायदेतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातले तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. व्हॉट्सॲप यूजर्सला वारंवार स्पॅम मेसेज पाठवल्यास त्याची तक्रार करता येते. त्यानंतर व्हॉट्सॲपकडून संबंधित अकाउंटवर कारवाई करण्यात येते.