काँग्रेसचा जाहीरनामा ५ एप्रिलला घोषित करणार; जयराम रमेश यांची माहिती

काँग्रेसने १६ मार्च रोजी पक्षाने त्यांचे 'पांच न्याय', 'पचीस हमी' जारी केले आणि देशभरात आठ कोटी हमी कार्डांचे वितरण करण्याची 'घर घर हमी' मोहीम ३ एप्रिलपासून सुरू होईल, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा ५ एप्रिलला घोषित करणार; जयराम रमेश यांची माहिती

नवी दिल्ली : येत्या ५ एप्रिलला काँग्रेसने आपला जाहीरनामा घोषित करणार असल्याचे जाहीर केले तर भाजपला शेवटच्या क्षणी जाहीरनामा समिती स्थापन केल्याबद्दल फटकारले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेसने १६ मार्च रोजी पक्षाने त्यांचे 'पांच न्याय', 'पचीस हमी' जारी केले आणि देशभरात आठ कोटी हमी कार्डांचे वितरण करण्याची 'घर घर हमी' मोहीम ३ एप्रिलपासून सुरू होईल. भाजपने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा तयार करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली २७ सदस्यीय समितीची घोषणा केली, ज्यात अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

जयराम रमेश म्हणाले की, भाजपचा जाहीरनामा, हा शेवटच्या क्षणी सुरू झाला आहे, त्यांची ही कृती म्हणजे केवळ औपचारिकता दाखविण्याचा भाग आहे. भाजप ज्या प्रकारे जनतेकडे पाहतो तेच यातून प्रतिबिंबित झाले आहे, असा आरोपही रमेश यांनी केला.

काँग्रेसने देशव्यापी सल्लामसलत केल्यानंतर आणि ईमेलद्वारे आणि आमच्या 'आवाज भारत की' वेबसाइटद्वारे हजारो सूचना प्राप्त केल्यानंतर जाहीरनामा संकलित करण्यात आला, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in