डिसेंबरमध्ये ‘व्हाईट कॉलर’ नोकरभरतीत १६ टक्के घट; आयटी, इतर क्षेत्रातील सावध भरतीचा परिणाम

नोकरी जॉबस्पीक इंडेक्सनुसार, बीपीओ, शिक्षण, रिटेल आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांत नोकरभरती होताना सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
डिसेंबरमध्ये ‘व्हाईट कॉलर’ नोकरभरतीत १६ टक्के घट; आयटी, इतर क्षेत्रातील सावध भरतीचा परिणाम

मुंबई : कंपन्यांकडून नोकरभरती करताना सावध भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे भारतातील ‘व्हाईट कॉलर’ भरतीमध्ये- आयटी, बीपीओ, शिक्षण, रिटेल आणि आरोग्य सेवा क्षेत्रात डिसेंबरमध्ये १६ टक्क्यांनी घट झाली आहे, असे मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे. नोव्हेबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये बिगरआयटी क्षेत्रामुळे नोकरभरतीमध्ये आम्ही २ टक्क्यांची किरकोळ वाढ झाल्याचे पाहिले. तथापि, आयटी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत राहिला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत एकंदर निर्देशांक १६ टक्क्यांनी घसरला. आयटी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावरील भरतीसाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल, असे नोकरीडॉटकॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी नोकरी जॉबस्पीक इंडेक्सचे विश्लेषण करताना सांगितले.

नोकरी जॉबस्पीक इंडेक्सनुसार, बीपीओ, शिक्षण, रिटेल आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांत नोकरभरती होताना सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. या क्षेत्रात वार्षिक आधारावर डिसेंबरमध्ये नोकरभरतीत अनुक्रमे १७ टक्के, ११ टक्के, ११ टक्के आणि १० टक्क्यांची घसरण दिसून आली. २०२३ च्या उत्तरार्धात आयटी क्षेत्रात नोकरभरतीचा कल दिसून आला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत डिसेंबर २०२३ मध्ये या क्षेत्रात २१ टक्क्यांची घट झाली आणि नोव्हेंबर २०२३ च्या आधीच्या महिन्याच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घसरण झाली. तथापि, आयटी उद्योगासाठी सावध भूमिका असतानाही संपूर्ण आकडेवारी पाहता सायंटिस्ट, आयटी पायाभूत सुविधा अभियंता आणि ऑटोमेशन अभियंता यांची भरती झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in