Payal Gaming : कोण आहे पायल गेमिंग? व्हायरल MMS व्हिडिओमुळे आली चर्चेत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित MMS व्हिडिओमुळे 'पायल गेमिंग' नावाची चांगलीच चर्चा आहे. १९ मिनिटांच्या 'प्रायव्हेट' व्हिडिओमध्ये...
कोण आहे पायल गेमिंग?
कोण आहे पायल गेमिंग? छायाचित्र : फेसबूक (Payal Gaming)
Published on

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित MMS व्हिडिओमुळे 'पायल गेमिंग' नावाची चांगलीच चर्चा आहे. १९ मिनिटांच्या 'प्रायव्हेट' व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी 'पायल गेमिंग' असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, अनेक नेटकरी हा 'एआय डीपफेक' व्हिडिओ असल्याचं म्हणत आहेत. अशातच स्वतः पायल गेमिंगने या प्रकरणावर मौन सोडले असून व्हिडिओमधील तरुणी मी नसून माझा त्या व्हिडिओशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.

ऑनलाइन गेमिंग जगतात मोठे नाव

पायल गेमिंगचे खरे नाव पायल धारे आहे, ती तिच्या गेमप्ले व्हिडिओ आणि YouTube वरील लाईव्ह स्ट्रीमसाठी ओळखली जाते. पायल गेमिंग तिच्या क्रॅब, कॉल ऑफ ड्यूटी, BGMI, PUBG आणि GTA TV सारख्या गेमसाठी ओळखली जाते. २५ वर्षीय पायल ऑनलाइन गेमिंग जगतात एक मोठे नाव आहे. तिचे YouTube वर ४.५ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर ४.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. गेमिंग व्यतिरिक्त, पायल लाइफस्टाइल कंटेंट देखील बनवते. तिने बॉलिवूड अभिनेत्री फराह खान आणि समांथा रूथ प्रभू सोबतही काम केले आहे. पायल गेमिंग मध्य प्रदेशातील इंदूरजवळील छिंदवाडा येथील रहिवासी आहे.

पीएम मोदींचीही घेतली होती भेट

गेल्या वर्षी, पायल गेमिंग आणि इतर काही भारतीय गेमर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांनी देशातील गेमिंगच्या भविष्याबद्दल चर्चा केली होती. सर्व गेमर्समध्ये पायल एकमेव महिला होती. "मी भारतातील आघाडीची महिला इन्फ्ल्यूएंसर बनेन असा मी कधी विचारही केला नव्हता, असे पायल म्हणाली होती.

पायल गेमिंगने सोडलं मौन

एवढ्या वैयक्तिक आणि त्रासदायक गोष्टीबद्दल मला सार्वजनिकपणे बोलावं लागेल, असा मी कधीच विचारही केला नव्हता. काही दिवसांपासून, डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेल्या एका व्हिडिओशी माझं नाव आणि फोटो चुकीच्या पद्धतीने जोडलं जातंय. मला हे स्पष्टपणे सांगायचंय की, त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही, आणि त्यात दिसणाऱया व्यक्तीचा माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्याप्रमाणेच ऑनलाईन गैरप्रकाराच्या शिकार ठरलेल्या असंख्य महिलांसाठी मला बोललं पाहिजे. हा केवळ हानी पोहोचवणारा कंटेट नाहीये, तर तो मनावर घाव घालणारा आणि अमानवयीयही आहे. कृपया हा कंटेट कुणीही शेअर करू नका. त्यावर चर्चा करू नका. याविरोधात कारवाईसाठी कायदेशीर पावले उचलली आहेत, असे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.

अखेरीस, या कठीण काळात ज्यांनी मला पाठिंबा, सहानुभूती आणि समज दाखवली, त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे, असेही ती म्हणाली.

logo
marathi.freepressjournal.in