अमेरिकेने भारतीयांना 'साखळदंडात' बांधून का पाठवले? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिले उत्तर...

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना पुन्हा पाठवताना अमेरिकन सरकारने या नागरिकांना साखळदंडात बांधून पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत गुरुवारी उत्तर दिले.
अमेरिकेने भारतीयांना 'साखळदंडात' बांधून का पाठवले? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिले उत्तर...
अमेरिकेने भारतीयांना 'साखळदंडात' बांधून का पाठवले? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिले उत्तर...ANI
Published on

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना पुन्हा पाठवताना अमेरिकन सरकारने या नागरिकांना साखळदंडात बांधून पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत गुरुवारी उत्तर दिले. बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा पाठवण्याची कारवाई ही अमेरिकेतील 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट' (Immigration and Customs Enforcement - ICE) द्वारे केली जाते. ICE तिच्या 2012 पासून ठरवलेल्या मानकांप्रमाणे प्रक्रिया पार पाडते. याच प्रक्रियेने 5 फेब्रुवारीला नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. तसेच त्यांनी भारत सरकार अमेरिकन सरकारच्या संपर्कात असून अशी कारवाई करताना प्रवाशांसोबत गैरवर्तन केले जाणार नाही, याची खात्री केली जाईल, असे म्हटले आहे.

...म्हणून घातल्या होत्या बेड्या

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या मुद्द्यावर संसदेच्या नियम २५१ अंतर्गत निवेदन दिले. यावेळी ते म्हणाले, कोणत्याही देशाचे नागरिक जर दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्यांना पुन्हा घेणे हे त्या देशाचे कर्तव्य असते. तसेच 5 फेब्रुवारीला ज्या लोकांना परत पाठवण्यात आले त्यांना ICE च्या जुन्या 2012 प्रमाणे ठरलेली प्रक्रियेद्वारे परत पाठवण्यात आले. यात अंतर्भूत नियमांप्रमाणे प्रवासादरम्यान अन्न, वैद्यकीय आणि आपत्कालीन गरजा पूर्ण केल्या जातात. तसेच शौचालय ब्रेक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात बेड्या घातल्या जातात. मात्र, या प्रक्रियेत महिला आणि मुलांना अशा प्रकारे प्रतिबंधित केले जात नाही. तसेच अमेरिकेने केलेली ही हद्दपारीची कारवाई नवीन नाही. ती 2009 पासून करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. जयशंकर यांनी 2009 पासून आतापर्यंत दरवर्षी किती भारतीयांना परत पाठवले आहे, याची आकडेवारी त्यांनी सभागृहात मांडली.

एजंटवर कारवाई होणार

परत आलेल्या नागरिकांनी त्यांना अमेरिकेत पोहोचवणाऱ्या एजंट आणि इतरांबद्दल जी माहिती दिली आहे त्या आधारे, कायदा अंमलबजावणी संस्था आवश्यक ती कारवाई करेल, असेही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

ट्रम्प सरकारने बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांपैकी 104 जणांना पुन्हा भारतात पाठवले. अमेरिकेचे C-17 लष्करी विमान हे या भारतीय नागरिकांना घेऊन बुधवारी अमृतसर येथे पोहोचले. यामध्ये हरियाणा आणि गुजरात येथून प्रत्येकी 33 जण होते. 30 पंजाब येथून तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथून 3 जण आणि दोन जण चंदीगढ येथून होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच यामध्ये 19 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. अल्पवयीन मुलांमध्ये चार वर्षीय मुलाचा आणि दोन मुलींचा समावेश आहे. तसेच 5 आणि 7 वर्षीय मुले देखील आहेत. अमृतसर विमानतळावरून त्यांना पोलिसांच्या गाडीतून त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in