मच्छर काही जणांनाच का चावतात?शास्त्रीय कारण झाले उघड

शरीरात कार्बन डायऑक्साईड सोडण्याची क्रिया, शरीराचे तापमान व शरीरातून वास आदींचा वेध घेते.
मच्छर काही जणांनाच का चावतात?शास्त्रीय कारण झाले उघड

मच्छर चावणे सामान्य आहे. पण, मच्छर चावल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत असते. घरात किंवा परिसरात वावरताना एखाद्याच व्यक्तीला मच्छर का चावतात? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? नसेल तर काहीही हरकत नाही. शास्त्रज्ञांनी याची शास्त्रीय कारणे शोधली आहेत.

मच्छर हा छोटासा कीटक असला तरीही त्याचा दंश भयंकर असतो. मच्छरची मादी माणसाच्या शरीरात कार्बन डायऑक्साईड सोडण्याची क्रिया, शरीराचे तापमान व शरीरातून वास आदींचा वेध घेते. तिच्यापासून तुम्ही वाचू शकत नाही. हॉवर्ड ह्युजेस वैद्यकीय संस्थेचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी लेस्ली वॉस्हॉल यांनी याबाबत प्रदीर्घ काळ अभ्यास केला. त्यातून काही शास्त्रीय माहिती उघड झाली आहे. आपल्या शरीराच्या त्वचेतून बाहेर पडणारे फॅटी अॅसिड्स एक मादक परफ्यूम तयार करू शकतात, ज्याचा डास प्रतिकार करू शकत नाहीत. तुमच्या शरीरावर फॅटी ॲॅसिड‌्स‌ असल्यास मच्छर त्याकडे आकर्षित होतात.

शास्त्रज्ञांनी यासाठी तीन वर्षे संशोधन केले. या संशोधनात सहभागी झालेल्या आठ जणांना शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या चेंबरमध्ये ठेवले होते. त्यांना दिवसातून सहा तास नायलॉनचे कपडे घातले होते. एका चेंबरमध्ये झिका, डेंग्यू, यलो फिव्हर व चिकनगुनिया पसरवणारे इडिस इजिप्ती जातीचे मच्छर सोडण्यात आले. यात काही जणांनाच मच्छरांनी दंश केला, तर काही जणांना मच्छरांनी दंश केलाच नाही. ज्यांना मच्छरांनी दंश केला, त्या व्यक्तींच्या त्वचेवर ५० रेणूसुत्रे सापडली. तसेच या व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा जास्त कॉर्बोलिक ॲॅसिड सोडत असल्याचे आढळले. आमच्या संशोधनामुळे मच्छरांच्या आणखी काही जातींचा अभ्यास करण्यास शास्त्रज्ञांना प्रेरणा मिळेल. त्यातून जागतिक सत्य समोर येईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in