स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिले; इतरांच्या मुलींना संन्यासी का बनवता? मद्रास हायकोर्टाचा सद्गुरूंना सवाल

अध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले, आता ते इतरांच्या मुलींना मुंडन करण्यास आणि सांसारिक जीवनाचा त्याग करून संन्याशांसारखे जीवन जगण्यास का प्रोत्साहन देत आहेत...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र(isha.sadhguru.org)
Published on

चेन्नई : अध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले, आता ते इतरांच्या मुलींना मुंडन करण्यास आणि सांसारिक जीवनाचा त्याग करून संन्याशांसारखे जीवन जगण्यास का प्रोत्साहन देत आहेत, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने ईशा फाऊंडेशनला मंगळवारी केला.

कोईम्बतूर येथील तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी ईशा फाऊंडेशनविरोधात याचिका दाखल केली आहे. आपल्या दोन मुली - गीता कामराज उर्फ ​​माँ माथी (४२ वर्षे) आणि लता कामराज उर्फ ​​माँ मायू (३९ वर्षे) यांना ईशा योग केंद्रात कैदेत ठेवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला.

ईशा फाऊंडेशनने त्यांच्या मुलींचे ब्रेनवॉश केले, त्यामुळे त्या तपस्वी झाल्याचा व मुलींना अन्न आणि औषध दिले जात असल्याने त्यांची विचारशक्ती नष्ट झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यावर न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम आणि व्ही. शिवगणनम यांच्या खंडपीठाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व प्रकरणांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in