विकीपीडिया पूर्णपणे विश्वासार्ह नाही! सुप्रीम कोर्टाचा सावधानतेचा इशारा

वापरकर्ते या माध्यमावर माहितीची देवाण-घेवाण करत असल्यामुळे त्यावर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही
विकीपीडिया पूर्णपणे विश्वासार्ह नाही! सुप्रीम कोर्टाचा सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : कायदेशीर विवाद निराकरण करण्यासाठी विकीपीडियाच्या वापरावर सर्वोच्च अवलंबून राहू नये. विकीपीडिया हे पूर्णपणे विश्वासार्ह नाही, असा सावधतेचा इशारा सुप्रीम कोर्टाने एका सुनावणीदरम्यान अन्य कोर्टांना तसेच निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

विकीपीडिया हे माध्यम ज्ञानाचा खजिना असूनही क्राऊडसोर्सवर आधारित आहे. तसेच वापरकर्ते या माध्यमावर माहितीची देवाण-घेवाण करत असल्यामुळे त्यावर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. काही वेळेला या माध्यमातून चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ शकते, असे निरीक्षण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि विक्रम नाथ यांनी नोंदवले आहे.

काही वेळेला आयकर विभागाचे आयुक्त कोणत्या मुद्द्याच्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी विकीपीडियासह ऑनलाइन माध्यमाचा सर्रासपणे वापर करतात. अशा माध्यमाद्वारे जगभरातील माहिती गोळा करण्याचे मोफत साधन उपलब्ध होते, मात्र कायदेशीर वादविवादाचे निराकरण करण्यासाठी अशा माध्यमांचा जपून वापर करायला हवा. शैक्षणिक सत्यतेचा विचार करता विकीपीडियासारखी माध्यमे ज्ञानाचा अफाट खजिना असली तरी त्यावर पूर्णपणे विसंबून राहून चालणार नाही. ही माध्यमे पूर्णपणे विश्वासार्ह नाहीत. याआधीही अशा माध्यमातून चुकीची माहिती लोकांपर्यंत गेली आहे. त्यामुळे कोर्ट किंवा निर्णयाधीन अधिकाऱ्यांनी अशा प्लॅटफॉर्मचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in