मनसे एनडीएत सामील होणार? दिल्लीत राज ठाकरे-अमित शहा यांच्यात अर्धा तास चर्चा

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी भाजप मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न अनेक दिवसापासून सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
मनसे एनडीएत सामील होणार? दिल्लीत राज ठाकरे-अमित शहा यांच्यात अर्धा तास चर्चा
Published on

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक संपली आहे. आज दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट झाली. यावेळी ठाकरे-शहा या दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाल्याची माहिती माध्यमांतून समोर येत आहे. या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशने रवाना झाले आहेत. यानंतर राज ठाकरे देखील एनडीएमध्ये सामील होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे-शहा या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या निवडणुकीत राज ठाकरेंना दक्षिण मुंबईची जागा दिली जाऊ शकते. या जागेवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यात वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शहा हे राज्यातील काही नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा देखली करणार आहेत. यानंतर महायुतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय होईल. शहा-ठाकरेंच्या भेटीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे देखील उपस्थितीत होते.

बीएमसी निवडणुकीत भाजपला मनसेचा फायदा

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी भाजप मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी शेलारांनी दिल्लीचा मसेज राज ठाकरेंना दिल्याचे सांगितले जाते. यामुळे आगामी विधानसभा आणि बीएमसी निवडणुकीत भाजपला उद्धव ठाकरेंच्या विरोधात चांगला फायदा होईल. त्या दृष्टीने मनसेला एनडीएत सामील केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला होता. परंतु निवडणुकीच्या घोषणेनंतर अवघ्या चार दिवसात राज ठाकरेंनी जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत दाखल झाल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचविल्या आहेत. आता राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर काय बोलणार आणि काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.

logo
marathi.freepressjournal.in