हवाई भाड्यावरील मर्यादा हटविण्याचा आढावा घेणार,एटीएफ किमतींवर आधारित दर शक्य - सिंधिया

कोरोना संकटानंतर विमान वाहतूक क्षेत्र सावरण्याच्या मार्गावर आहे. विशेषतः प्रवाशांची वाढती संख्या पाहता हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे
हवाई भाड्यावरील मर्यादा हटविण्याचा आढावा घेणार,एटीएफ किमतींवर आधारित दर शक्य - सिंधिया

देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी निश्चित केलेल्या भाडे मर्यादेचे निश्चितपणे पुनर्मूल्यांकन केले जाईल आणि जेट इंधनाच्या किमतींवर आधारित दर ठरवणे शक्य होईल. त्यामुळे विमान कंपन्यांमध्ये दराच्या बाबतीत निकोप स्पर्धा निर्माण होईल, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटानंतर विमान वाहतूक क्षेत्र सावरण्याच्या मार्गावर आहे. विशेषतः प्रवाशांची वाढती संख्या पाहता हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अकासा एअरने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातही प्रवेश केला आहे. गेल्या आठ वर्षांत देशांतर्गत विमानसेवा सुरू करणारी ही पहिली विमान कंपनी आहे.

कोरोना महामारीच्या काळात सरकारने यापूर्वी विमान कंपन्यांसाठी भाडे मर्यादा प्रणाली लागू केली होती. त्यानुसार, सरकार दर १५ दिवसांच्या अंतराने विमान कंपन्यांचे किमान आणि कमाल भाडे निश्चित केले जाते. एअरलाइन्स त्यांचे भाडे या मर्यादेच्या वर किंवा खाली ठेवू शकत नाहीत. दर १५ दिवसांनी भाडे नियंत्रण व्यवस्थेचा आढावा घेतला जातो.

पीटीआय वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सध्या विमान कंपन्यांचे भाडे मर्यादा असलेल्या कॅपच्या किमान दराच्या जवळ नाही आणि कमाल दरापासून दूर आहे.

दरम्यान एटीएफच्या किमती कमी होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर आम्ही निश्चितपणे भाड्यांबाबत ठोस निर्णय घेऊ. गेल्या मे महिन्यात ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, फेअरकॅप प्रणाली विमान प्रवाशांसाठी संरक्षक म्हणून काम करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in