विरोधी पक्षांच्या बंगळुरु येथील बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार ? राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांनी स्पष्ट केली भूमिका

पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीपेक्षा आज बंगळुरु येथे होणाऱ्या दुसऱ्या बैठकीला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. कारण...
विरोधी पक्षांच्या बंगळुरु येथील बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार ? राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांनी स्पष्ट केली भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र येत सर्व विरोधकांनी आगामी लोकसभेत मोदींच्या विजयी रथ रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुढाकाराने पाटणा येथे विरोधकांच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

आता पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर विरोधकांनी बंगळूरु येथे दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी याबाबातची माहिती दिली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने देखील याबाबतचं वृत्त दिलं आहे. बंगळुरु येथे आजपासून विरोधाकांच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात होतं आहे.

पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीपेक्षा आज बंगळुरु येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. कारण या बैठकीला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांची संख्या देखील वाढली आहे. या बैठकीपूर्वीच्या स्नेहभोजनाला शरद पवार हे उपस्थित राहणार नसले तरी ते उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in