सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवणार?

राजस्थानात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. या तीन नावांवर भाजप व कँग्रेसमध्ये विचार चालला आहे. कारण यानंतर लोकसभा निवडणूक असल्याने दोन्ही पक्ष विचार करून निर्णय घेत आहेत.
Sonia Gandhi
Sonia GandhiANI

जयपूर : राजस्थानात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. या तीन नावांवर भाजप व कँग्रेसमध्ये विचार चालला आहे. कारण यानंतर लोकसभा निवडणूक असल्याने दोन्ही पक्ष विचार करून निर्णय घेत आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जागेवर अन्य नेत्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्यात सोनिया गांधी यांचे नाव जवळजवळ निश्चीत आहे. प्रकृतीच्या कारणावरून रायबरेलीतून त्या लोकसभा निवडणूक लढवू इच्छित नसल्याचे कळते. त्यामुळे त्यांना राजस्थानातून राज्यसभेत पाठवले जाईल. राजस्थानच्या १० राज्यसभा जागांपैकी कँग्रेसकडे अजूनही ६ जागा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in