सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत तातडीचे निमंत्रण, राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेकांनी काँग्रेसला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे
सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत तातडीचे निमंत्रण, राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले आहे. त्यामुळे रविवारचे सगळे कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत रवाना झाले आहेत. आपण तातडीने दिल्लीला जात आहोत, असे स्वतः शिंदे यांनी सांगितले.

ज्योतिरादित्य शिंदे तर यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर कपिल सिब्बल यांनीही अपक्ष राहून वेगळी वाट चोखाळली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेकांनी काँग्रेसला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसजनांच्या मागे आता ईडीचे शुक्लकाष्ठ लागत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांना थेट अ. भा. काँग्रेस समितीने निमंत्रण धाडले आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. २००२ मध्ये भैरोसिंह शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार, हे निश्चित होते. तरीही शिंदे यांची उमेदवारी दिली होती. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल, तोच उमेदवार विजयी होणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तरीही सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. सोमवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात पुन्हा एकदा चौकशीला तोंड देण्यासाठी जावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in