गोगरा-हॉटस्पि्रंग’मधून दोन्ही देशांच्या सैन्यांची माघार

भारत आणि चीनच्या लष्कराची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सैन्य माघारीचा निर्णय घेण्यात आला
गोगरा-हॉटस्पि्रंग’मधून  दोन्ही देशांच्या सैन्यांची माघार
Published on

भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वादाचा मुद्दा ठरलेल्या लडाखमधील गोगरा-हॉटस्िप्रंग क्षेत्रातून दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घेण्यास सहमती दशर्वली आहे. तसेच दोन्ही देशांनी त्या भागातून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. मे २०२० पासून दोन्ही देशांमध्ये या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.

भारत आणि चीनच्या लष्कराची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सैन्य माघारीचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. सीमावर्ती भागात शांतता कायम ठेवण्यासाठी चीननेही या निर्णयाला मान्यता दिली.

जुलैमध्ये झालेल्या महत्त्वाच्या कमांडर स्तरावरील १६ बैठकीच्या फेरीत दोन्ही देशांमध्ये याबाबत सहमती झाली. त्यानुसार, शांतता प्रस्तापित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. संरक्षण खात्याच्या माहितीनुसार, भारत आणि चीनमधील कमांडर स्तरावर १६ व्या बैठकीत गोगरा-हॉटस्प्रिंग (पीपी १५) च्या क्षेत्रात भारतीय व चिनी सैनिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in