मुलांना भिकेला लावून महिलेने जमवली मोठी ‘माया’, ४५ दिवसांतच कमवले २.५ लाख रुपये

इंद्राबाईचा भीक मागण्याचा व्यवसाय आहे. तिच्यावर भीक मागणे व आपल्या मुलांचा छळ करणे आदी गुन्हे नोंदवले आहेत.
मुलांना भिकेला लावून महिलेने जमवली मोठी ‘माया’, ४५ दिवसांतच कमवले २.५ लाख रुपये
(प्रातिनिधिक छायाचित्र)

इंदूर : इंदूरच्या इंद्राबाईने आपल्या मुलांना भीक मागण्यासाठी बसवून प्रचंड संपत्ती कमावली आहे. ४५ दिवसांत अडीच लाख रुपये जमवले आहेत. तसेच तिच्याकडे भूखंड, दुमजली घर, दुचाकी, २० हजारांचा स्मार्टफोन देखील आहे.

इंद्राबाईचा भीक मागण्याचा व्यवसाय आहे. तिच्यावर भीक मागणे व आपल्या मुलांचा छळ करणे आदी गुन्हे नोंदवले आहेत. तिला या गुन्ह्याप्रकरणी सोमवारी तुरुंगात पाठवण्यात आले. ‘प्रवेश’ या स्वयंसेवी संस्थेच्या मोहिमेमुळे तिच्यावर पोलिसांनी कारवाई केली. इंद्राबाईने सांगितले की, उपासमारीने मरण्यापेक्षा मी भीक मागण्याचा मार्ग पत्करला. चोरीपेक्षा भीक मागणे कधीही चांगले, असे तिने सांगितले.

इंद्राबाई ही महिला इंदूर-उज्जैन रस्त्यावर भीक मागताना आढळली. तिच्याकडे १९,२०० रुपये सापडले आहेत, अशी माहिती ‘प्रवेश’ या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष रूपाली जैन यांनी दिली. ‘प्रवेश’ ही संस्था इंदूरला भिकारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंद्राबाई ही पाच मुलांची आहे. तिने तिच्या तीन मुलींना रस्त्यावर भीक मागायला बसवले. गेल्या ४५ दिवसांत २.५ लाख रुपये कमावले, अशी माहिती तिने दिली. त्यातील एक लाख रुपये तिने सासऱ्यांना पाठवले, तर ५० हजार रुपये बँक खात्यात भरले.

logo
marathi.freepressjournal.in