पॅराग्लायडिंग करताना कुल्लूत महिलेचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रविवारी पॅराग्लायडिंग अपघातात हैदराबाद येथील २६ वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पायलटला अटक केली आहे.
पॅराग्लायडिंग करताना कुल्लूत महिलेचा मृत्यू
Published on

मनाली : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रविवारी पॅराग्लायडिंग अपघातात हैदराबाद येथील २६ वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पायलटला अटक केली आहे. पोलिसांनी अहवालात म्हटले आहे की, पॅराग्लायडिंगच्या वेळी पायलटने पर्यटक महिलेचा सेफ्टी बेल्ट नीट बांधला नव्हता, ज्यामुळे पॅराग्लायडिंग सत्रादरम्यान उंचावरून पडून तिचा मृत्यू झाला. पर्यटन अधिकारी सुनैना शर्मा यांनी या घटनेनंतर, नमूद केले की पायलट हा नोंदणीकृत होता आणि वापरलेल्या उपकरणांना मान्यता देण्यात आली होती. तपासात असे दिसून आले आहे की, ‘मानवी चुकांमुळे’ हा अपघात झाला. हवामानाशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती.

logo
marathi.freepressjournal.in