मॅडम! लग्नाला दोन वर्षे उलटूनही नवऱ्याकडून 'ते' प्रेम मिळाले नाही, शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची FIR

मी माझ्या आई-वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला असता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी हा प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही
मॅडम! लग्नाला दोन वर्षे उलटूनही नवऱ्याकडून 'ते' प्रेम मिळाले नाही, शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पतीविरोधात पत्नीची FIR
प्रातिनिधिक छायाचित्र

मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने पोलिस ठाणे गाठून, लग्नाला दोन वर्षे उलटली तरीही पती तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत नाही, अशी तक्रार केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह ६ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही महिला वैशाली जिल्ह्यातील लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावची रहिवासी आहे. पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये तिने म्हटल्यानुसार, 'माझे लग्न ३१ मे २०२१ रोजी झाले. लग्नानंतर मी सासरी गेले. तेव्हापासूनच पती दुर्लक्ष करतो. लग्नाला दोन वर्षे उलटली तरीही पतीने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत. मग मी सासरच्यांना सांगितलं. पण त्यांच्याकडूनही मला काहीच मदत मिळाली नाही. याबाबत मी पतीशी बोलले तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण केली. मी माझ्या आई-वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला असता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली'.

लग्न मोडून वैशाली जिल्ह्यातील आपल्या आई-वडिलांच्या घरी जाण्यासाठी महिलेने मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. हा प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, मात्र काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. उलट सतत शिवीगाळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याचा दावाही तिने केला आहे. अखेर तिने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

समजूत काढूनही काहीच उपयोग न झाल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३४१, ३२३, ४९८ अ, ३७९, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in