दिल्लीत मंदिरातील स्टेज कोसळून महिला ठार

या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याक आला आहे
दिल्लीत मंदिरातील स्टेज कोसळून महिला ठार

नवी दिल्ली : कालकाजी मंदिरात देवीच्या जागरणासाठी उभारलेले स्टेज कोसळून रविवारी पहाटे एक ४५ वर्षीय महिला मरण पावली तर १५ जण जखमी झाले. या संबंधात माहिती देणारा फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक १२.३० वा. च्या दरम्यान रवाना झाले. जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याक आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in