...आणि महिलेने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल...

चारचाकी गाडी लावण्याच्या वादावरुन या नेत्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
...आणि महिलेने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल...

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असते आणि तो चर्चेचा विषय ठरत असतो. आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका महिलेने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावल्याचं दिसून येत आहे. चारचाकी गाडी लावण्याच्या वादावरुन या नेत्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर जोडपं आणि नेता यांच्यात शाब्दीत चकमक झाली. यावेळी उपस्थित महिलेने या नेत्यांच्या कानाखाली वाजवली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून व्हिडिओ बनवनारा व्यक्ती संबंधित नेत्याला त्यांचे नाव विचारताना दिसत आहे. त्यावेळी व्हिडिओतील पांढरे कपडे घातलेली व्यक्ती म्हणते, "नाव काय विचारतो...मी तुझा बाप आहे", असं म्हटल्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. यावेळी त्या ठिकाणी उभी असलेली महिलेकडून या नेत्याला कानशिलात वाजवली जाते. "माझ्या नवऱ्यावर हात उचलतो", असं म्हणत संबंधित महिला कथित नेत्याला कानशिलात मारते.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओतील हा नेता भाजपचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओत दिसत असलेल्या गाडीवर भाजपचा झेंडा असल्याचं पाहायला मिळते. तसंच, हा वादग्रस्त भाजप नेता माजी नगरसेवक अतुल दीक्षित असल्याचं समजत आहे.

logo
marathi.freepressjournal.in