दिल्लीतील महिलांनाही मिळणार दरमहा १ हजार रुपये; ‘आप’ पुन्हा सत्तेवर आल्यास रक्कम २१०० रुपये होणार

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही गुरुवारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली.
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवालसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही गुरुवारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली. यानुसार महिलांना दरमहा एक हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे, मात्र निवडणुकीनंतर ते वाढवून २१०० रुपये अर्थसाह्य देण्यात येईल, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक लवकरच दरमहा १ हजार रुपये

जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये निवडणुकीनंतर रक्कम जमा होईल, असेही ते म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या मंत्रिमंडळाने योजनेला मान्यता दिली असून त्यासाठी महिला शुक्रवारपासून नोंदणी करू शकतात, असेही ते म्हणाले.

निवडणुकीनंतर आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास अर्थसाह्याची रक्कम २१०० रुपये केली जाईल. प्रथम २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांना सक्षम करण्यासाठी अर्थसाह्य

महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना अर्थसाह्य करण्यासाठी ही योजना आहे. मात्र, भाजपने ही मोफत रेवडी योजना असल्याची टीका केली असली तरी समाज सक्षम करण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे या दृष्टिकोनातून आपण याकडे पाहतो, असे केजरीवाल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in