मार्चमध्ये रंगणार महिलांची आयपीएल; पाच संघांचा समावेश निश्चित

सौरव गांगुली यांनी काही महिन्यांपूर्वीच पुढील वर्षी पुरुषांप्रमाणेच महिलांची आयपीएल खेळवण्याबाबत मत व्यक्त केले होते
मार्चमध्ये रंगणार महिलांची आयपीएल; पाच संघांचा समावेश निश्चित

महिलांच्या आयपीएलला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये पाच संघांत भारतात महिलांची पूर्ण स्वरूपातील आयपीएल रंगणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले. तसेच एका संघात पाच परदेशी खेळाडूंना खेळवण्याची मुभाही देण्यात आली आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही महिन्यांपूर्वीच पुढील वर्षी पुरुषांप्रमाणेच महिलांची आयपीएल खेळवण्याबाबत मत व्यक्त केले होते. सध्याच्या माहितीनुसार पाचही संघ प्रत्येकाविरुद्ध दोन वेळा खेळतील. गुणतालिकेत अग्रस्थानी राहणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये उपांत्य फेरीचा थरार रंगेल.

दक्षिण आफ्रिका येथे ९ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ट्वेन्टी-२० विश्वचषक झाल्यानंतर महिलांच्या आयपीएलला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. पुरुषांची आयपीएल सुरू होईपर्यंत ही आयपीएल संपलेली असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in