Women's Reservation Bill : "...तर ब्रृजभूषण यांची हकालपट्टी का झाली नाही?", महिला खासदारांचा सरकारला सवाल

या विधेयकावर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर इतर महिलांनीही या चर्चेत सहभाग घेतला
Women's Reservation Bill : "...तर ब्रृजभूषण यांची हकालपट्टी का झाली नाही?", महिला खासदारांचा सरकारला सवाल

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. या विधेयकावर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर इतर महिलांनीही या चर्चेत सहभाग घेतला, यावेळी त्यांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं.

सरकारला जर महिलांची एवढीच काळजी आहे. तर त्यांनी खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांना पदावरुन का हटवलं नाही, असा सवाल त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार डॉ. काकोली घोष म्हणाल्या, "सरकारला जर महिलांची एवढीच काळजी चिंता होती. तर तुम्ही एकत्या वेळानं हे विधेयक का घेऊन आला आहात. निवडणुकीच्या तोंडावर हे विधेयक आणणं तुमच्या हेतूवर शंका निर्माण करतं. सरकारवर मला विश्वास नाही. महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक शोषण प्रकरणात ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई का करत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी म्हटलं की, महिला सक्षण असू शकत नाहीत का? त्यांनी कधी युद्ध लढली आणि जिंकली नाहीत का? इंदिरा गांधींसारख्या मजबूत नेत्या या देशात झाल्या नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. यावर भाजप खासदारांनी गोधळ सुरु केल्यावर त्या म्हणाल्या, जयललिता देकील सक्षम नेत्या होत्या. यावेळी सोनिया गांधी, मायावती, ममता बॅनर्जीस सुषमा स्वराज यांचं देखील नाव घेतलं.

डीएमकेच्या खासदार कनिमोझी बोलत असताना भाजप खासदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे जागेरुन उठल्या आणि त्या कनिमोझी यांच्याबरोबर बोलू लागल्या. यावेळी या दोघींनी अध्यक्षांना म्हटलं की, भाजपचे लोक महिलांचा असाच सन्मान करता का? यानंतर मात्र भाजप खासदार शांत झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in