गोव्यात शुक्रवारपासून जागतिक मराठी संमेलन; जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांची माहिती

मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या विद्यमाने कला अकादमी पणजी येथे ९, १० व ११ जानेवारी रोजी, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'शोध मराठी मनाचा' या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज पुण्यात दिली. हे संमेलन युट्युब लाईव्ह असणार आहे.
गोव्यात शुक्रवारपासून जागतिक मराठी संमेलन; जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांची माहिती
Published on

पुणे : मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या विद्यमाने कला अकादमी पणजी येथे ९, १० व ११ जानेवारी रोजी, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'शोध मराठी मनाचा' या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज पुण्यात दिली. हे संमेलन युट्युब लाईव्ह असणार आहे.

दि.९ रोजी दुपारी. २ वाजता ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या सत्राने संमेलनास सुरवात होईल. त्यात नामवंत अभिनेते चित्रपट दिग्दर्शक निर्माता महेश मांजरेकर यांच्याशी ब्रिटीश नंदी संवाद साधतील. त्यानंतर २.४५ वाजता ‘लक्ष्मीची पावले’ या सत्रात उद्योगपती अनिल खंवटे, भरत गीते (जर्मनी) व वैभव खांडगे (इंग्लंड) यांचे विचार ऐकण्याची संधी लाभणार आहे. सायंकाळी ४. वाजता ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा नाथ संस्थान ओसा यांचा चक्री भजन होईल. त्यानंतर ५.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरणाचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सामंत, महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत आणि जागतिक मराठी अकादमीचे रामदास फुटाणे यांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. अनिल काकोडकर अध्यक्षस्थान भूषवतील. उद्घाटनानंतर सायंकाळी ७.३० वाजता नितीन कोरगावकर निर्मित ‘मर्मबंधातील ठे’ हा सावेश, साभिनय नाट्यगीत सादरीकरण कार्यक्रम होईल.

दि. १० रोजी सकाळी ९ वाजता ‘मांडवीच्या तीरावर’ हे गोव्यातील कवींचे कवीसंमेलन अध्यक्षस्थानी प्रथितयश कवी डॉ. महेश केळुस्कर असतील.

दि. ११ रोजी ९.३० वाजता ‘सुर संवाद चित्रफित’ सत्रात किरण प्रधान (ऑस्ट्रेलिया) संवाद साधतील. नेपोलियन आल्मेदा (ऑस्ट्रेलिया) हे संवादक असतील. ‘आधारवड’ मध्ये राम माणूस गावडे, कमलाकांत तारी व संदीप परब यांचा समावेश असेल.

‘ट्रम्प ते पुतीन’ यावर चर्चासत्र

‘ट्रम्प ते पुतीन’ या जागतिक व्यवस्था व भारत संबंधित विषयावर गिरीश ठकार (अमेरिका), अनिल आंबेस्कर, डॉ. किरण ठाकूर, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, वैशाली पतंगे विचार मांडतील.

logo
marathi.freepressjournal.in