World Population : बाळाने जन्म घेतला आणि जगात एक इतिहास रचला गेला; वाचा नेमके प्रकरण काय?

लोकसंख्या (World Population) हा फक्त देशासाठीच नव्हे तर जगासाठी एका महत्त्वाची बाब. पण तुम्हाला माहितीय का या घडीला जगाची लोकसंख्या किती आहे?
World Population : बाळाने जन्म घेतला आणि जगात एक इतिहास रचला गेला; वाचा नेमके प्रकरण काय?

लोकसंख्या (World Population) हा सध्या जगासाठी एक महत्त्वाची बाब आहे. गेल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पण त्यानंतर आपल्या जगाची लोकसंख्या किती असेल, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर १५ नोव्हेंबरला जगाच्या कोपऱ्यात एका बाळाने जन्म घेतला आणि आपल्या जगाची लोकसंख्या ही ८०० कोटींवर जाऊन पोहचली. संयुक्त राष्ट्र संघटनेने ही माहिती दिली आहे. असे असले तरीही चिंता करण्याची गरज नाही, असेदेखील संयुक्त राष्ट्र संघटनेने स्पष्ट केले आहे.

"साधारण २१व्या शतकाच्या शेवटी जगाची लोकसंख्या १ हजार कोटी होईल, असा अंदाज आहे. परंतु त्यानंतर जन्मदर कमी होणार आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढणार नाही, अशी माहिती युनायटेड नेशनने दिली आहे. लोकसंख्या वाढीच्या या आकडेवारीतील विशेष गोष्ट म्हणजे मागील अवघ्या २४ वर्षांतच जगाची लोकसंख्या तब्बल २०० कोटींनी वाढली आहे. १९९८मध्ये जगाची लोकसंख्या ६०० कोटी होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in