चंदिगडमधील राष्ट्रध्वजाच्या मानवी प्रतिमेचा जागतिक विक्रम

चंदिगडच्या क्रिकेट स्टेडियमवर राष्ट्रध्वजाची जगातील सर्वात मोठी मानवी प्रतिमा साकारण्यात आली.
चंदिगडमधील राष्ट्रध्वजाच्या मानवी प्रतिमेचा जागतिक विक्रम

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशात वेगवेगळे विक्रम रचले गेले. त्यात चंदिगडमधील राष्ट्रध्वजाच्या मानवी प्रतिमेचा जागतिक विक्रम झाला. याशिवाय सहा कोटींहून अधिक लोकांचे तिरंग्यासोबत सेल्फी, श्रीनगरमधील १,८५० मीटर लांब राष्ट्रध्वज हे या महोत्सवातील मैलाचे दगड ठरले.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना ५,८८५ लोकांच्या सहभागातून चंदिगडच्या क्रिकेट स्टेडियमवर राष्ट्रध्वजाची जगातील सर्वात मोठी मानवी प्रतिमा साकारण्यात आली. याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‌्स‌’मध्ये नोंद झाली आहे. याशिवाय ‘हर घर तिरंगा’ या वेबसाईटवर मंगळवारपर्यंत सहा कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड केले गेले. ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत बक्षी स्टेडियम येथे श्रीनगर जिल्हा प्रशासनाकडून १,८५० मीटर लांब राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in