जागतिक मंदीची चिंता वाढली; घटलेला विकासदर आणि महागाई कारणीभूत

देश मंदीच्या गर्तेत गेले आहेत आणि जे गेले नाहीत ते २०२३पर्यंत मंदीत जाण्याची शक्यता आहे
जागतिक मंदीची चिंता वाढली; घटलेला विकासदर आणि महागाई कारणीभूत

व्याजदरात वाढ करून वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याची जगभरातील बहुतांश देशांची रणनीती फसलेली दिसते, कारण महागाई कमी होत नाही आणि विकासदराची घसरणही थांबत नाही. त्यामुळे मंदीची चिंता वाढली आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी गेल्या आठवड्यातच सांगितले की, या परंपरेनुसार आम्ही मंदीकडे पाहत नाहीत.

मूडीजच्या अहवालात म्हटले आहे की, अनेक देश मंदीच्या गर्तेत गेले आहेत आणि जे गेले नाहीत ते २०२३पर्यंत मंदीत जाण्याची शक्यता आहे. मूडीज अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक वातावरण अधिक नाजूक आहे आणि वाढत्या महागाईचा मोठा परिणाम होत आहे. विकासदरवाढीचा दर आणखी घसरल्याने महागाई वाढलेली दिसून येते. त्यामुळे यापुढे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

डॉलरची ताकद इतर चलने कमकुवत

अहवालानुसार, एकीकडे डॉलर मजबूत होत असताना जगातील सर्व चलनांचे मूल्य घसरले आहेत. त्याच वेळी जीडीपीमध्येही घट होत आहे. २०२२मध्ये जागतिक अर्थव्यवस्था २.७ टक्क्यांनी वाढू शकते, तर २०२३मध्ये ती आणखी घसरून २.३ टक्क्यांवर येऊ शकते. त्यामुळे मंदीची आणखी चिन्हे दिसत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

जगभरात महागाईबरोबरच बेरोजगारीही झपाट्याने वाढत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक विकासात सातत्याने घसरण होत असून, आगामी काळात त्यात आणखी वाढ होऊ शकते. जरी असे काही देश आहेत जिथे मंदी नाही; परंतु तिकडे मंदी येण्यास वेळ लागणार नाही. अनेक देशात व्यापारावर परिणाम होत असल्याने मंदीला आळा घालण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

२०२३मध्ये जगाचा विकासदर २.२ टक्के

आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी : Organization for Economic Co-operation and Development), ओईसीडीने अहवालात म्हटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत जागतिक वाढ खुंटली आहे. त्यामुळे अनेक अर्थव्यवस्थांचे आकडे मंदावू शकतात. या संस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी २०२३चा जीडीपी वाढीचा अंदाज जूनमधील २.८ टक्क्यांवरून २.२ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ओईसीडीचे अंतरिम मुख्य अर्थशास्त्रज्ञ अल्वारो परेरा म्हणाले की, काही महिन्यांत जोखीम वाढली आहे. जी- २० देशांत, तुर्की, इंडोनेशिया आणि यूके वगळता उर्वरित देशांच्या अर्थव्यवस्थांच्या विकासदरात कपात करण्यात आली आहे.

एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालांनुसार, जागतिक सकल देशांतर्गत उत्पादन या वर्षी २.८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, तेच २०२३मध्ये आणखी घसरणीसह दोन टक्क्यांपर्यंत खाली येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in