उद्घाटनाच्या दिवशीच कुस्तीपटू घालणार नव्या संसदेला घेराव

महिला पंचायच्या तयारीला वेग आला असून यात सहभागी होण्याचे आवाहन पैलवानांनी केले आहे.
उद्घाटनाच्या दिवशीच कुस्तीपटू घालणार नव्या संसदेला घेराव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे येत्या 28 मे रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. देशातल्या भाजपेतर विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला डावलले जात असल्याचे सांगून या कार्यक्रमाव बहिष्कार टाकला आहे. आता कुस्तीपटुंनी 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतील घेराव घालण्यचा इशारा दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तूपटूंनी हे आंदोलन पुकारले आहे. या विरोधात 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीबाहेर आंदोलन करणार असल्याचे पैलवान साक्षी मलिकने सांगितले आहे.

कुस्तीपटू बृजभूषण यांच्या अटकेवर ठाम आहेत. त्याविरोधात ते गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. या विरोधात त्यांनी 23 मे रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च देखील काढला होता. आता महिला पंचायच्या तयारीला वेग आला असून यात सहभागी होण्याचे आवाहन पैलवानांनी केले आहे.

नव्या संसदेच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे त्याच दिवशी संसदेला घेराव घालत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात हरियाणासह इतर राज्यातून देखील समर्थक येण्याची शक्यता आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीत 28 मे रोजी महिला महापंचायतचे आयोजन करण्यात येणार असल्याचे साक्षी मलिकने सांगितले. सिंधू बॉर्डर, गाजीपूर, टिकरी येथून समर्थन देण्यासाठी लोक येणार असल्याचेही कुस्तीपटूंनी सांगितले. या दिवशी 11:30 वाजता मार्च काढण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांच्या कृत्यावर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले तरीही आंदोलन सुरुच राहील. आम्हाला पोलिसांकडून ज्या ठिकाणी थांबवले जाईल, त्याच ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.

तसेच यासाठी पोलिसांची परवानगी मागितली जाईल. त्यांसाठी त्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. परवानगी मिळाली नाही, तर त्याची माहिती लगेच दिली जाईल, असे देखील साक्षी मलिकने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in