'यमुना एक्स्प्रेस-वे'वर भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू; ८ बस ३ गाड्या एकमेकांवर आदळून पेटल्या; १०० हून अधिक जण जखमी

दाट धुक्यामुळे ‘यमुना एक्स्प्रेस-वे’वर मंगळवारी ८ बस आणि ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यानंतर वाहनांना लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
'यमुना एक्स्प्रेस-वे'वर भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू; ८ बस ३ गाड्या एकमेकांवर आदळून पेटल्या; १०० हून अधिक जण जखमी
Photo : X (@ajaymishradelhi)
Published on

मथुरा : दाट धुक्यामुळे ‘यमुना एक्स्प्रेस-वे’वर मंगळवारी ८ बस आणि ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यानंतर वाहनांना लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

ही घटना बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२७ किमी माइलस्टोनजवळ मध्यरात्री ३.३० वाजता घडली. हा अपघात इतका भीषण होता की, झोपेमध्येच अनेकांचा जीव गेला. दाट धुक्यांमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दाट धुक्यांमुळे एक-एक करत ८ बस आणि ३ कारची जोरदार धडक झाली. अपघातानंतर अनेक वाहनांनी पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून अनेक प्रवाशांचा जीव गेला. वाहनांना आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आणि जखमींना बाहेर काढले. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १७ बॅगांमधून हाडांचे सांगाडे आणि जळालेले मृतदेह नेले. मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. ४ जणांची ओळख पटली आहे, तर इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

मृतांची संख्या वाढण्याची भीती

जखमींना मथुरा येथील जिल्हा रुग्णालय आणि वृंदावन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. ३८ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३९ जणांना बलदेव सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in