दहशतवाद, लव्ह-जिहादसाठी २५ हजार कोटींचा गैरवापर; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आरोप

हलाल सर्टिफिकेट लेबल असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करण्यापासून लोकांनी दूर राहावे कारण अशा वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा गैरवापर ‘दहशतवाद, लव्ह-जिहाद आणि धर्मांतर’ यासाठी केला जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
दहशतवाद, लव्ह-जिहादसाठी २५ हजार कोटींचा गैरवापर; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Published on

गोरखपूर : हलाल सर्टिफिकेट लेबल असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करण्यापासून लोकांनी दूर राहावे कारण अशा वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा गैरवापर ‘दहशतवाद, लव्ह-जिहाद आणि धर्मांतर’ यासाठी केला जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तसेच ‘हलाल’ सर्टिफिकेशनच्या माध्यमातून २५००० कोटी रुपये कमावले जातात, असा दावाही त्यांनी केला. श्रद्धेवर मोठे आघात केले असले तरी ‘राजकीय इस्लामकडे’ इतिहासात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे, असेही ते म्हणाले. आरएसएसच्या गोरखपूर विभागातर्फे आयोजित ‘विचार-परिवार कुटुंब स्नेह मिलन’ व ‘दीपोत्सनव से राष्ट्रोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते.

आदित्यनाथ यांनी असाही दावा केला की, जलालुद्दीन याला हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशांतून निधी मिळत होता. मी अशा प्रकारचे सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. जेव्हा तुम्ही खरेदीसाठी जाल, तेव्हा तुम्ही काळजीपूर्वकअशा वस्तू खरेदी करत नसल्याची खात्री करून घ्या. यामधून गोळा केलेला पैसा हा अशा प्रकारच्या षडयंत्रांमध्ये वापरला जाईल. आपल्या आसपासच्या भागात असे अनेक ‘छंगुर बाबा’ आजही सक्रिय आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तसेच यावेळी आदित्यनाथ यांनी बलरामपूर जिल्ह्यात छंगुर बाबा उर्फ जलालुद्दीन नावाच्या व्यक्तीकडून चालवल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा उल्लेख देखील केला. या रॅकेटचा पर्दाफाश करत करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा संदर्भ देत आदित्यनाथ म्हणाले की, आमचे पथक गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या हलचालींवर लक्ष ठेवून होते आणि मला दर महिन्याला गोळा झालेल्या गुप्त माहितीबद्दल अपडेट दिली जात असे. मी पथकाला सूचित केले होते की, जेव्हा भक्कम पुरावे गोळा होतील, तेव्हाच त्याला पकडा, जेणेकरून प्रभावी कारवाई करता येईल. दरम्यान मुख्यमंत्री आदित्यनाथ पुढे म्हणाले की तो सहा महिन्यांपूर्वी निसटला, तेव्हा ते मिशन अपयशी होत असल्यामुळे पथकावर ओरडले. जलालुद्दीन याला अखेर अटक झाली. तो समाजविरोधा कारवायांमध्ये सहभागी होता, असेही आदित्यनाथ म्हणाले.

राजकीय इस्लाममुळे सनातन धर्माचे मोठे नुकसान - योगी

योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान राजकीय इस्लाममुळे झाल्याचा दावा केला आहे. भारताच्या इतिहासात ब्रिटिश व फ्रेंच वसाहतवादाचा नेहमीच उल्लेख केला जातो. पण भारतातील राजकीय इस्लामबाबत मात्र अगदीच तुरळक उल्लेख आढळतो. याच राजकीय इस्लाममुळे सनातन धर्माला सर्वात मोठा धक्का दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंग, महाराणा प्रताप, महाराणा संगा यांच्यासारख्या महान योद्ध्यांनीही राजकीय इस्लामविरोधात लढा दिला आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. आपल्या पूर्वजांनी राजकीय इस्लामविरोधात मोठा लढा दिला, तरीही इतिहासाच्या या बाजू मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिली आहे. हा ‘राजकीय इस्लाम’ तोच आहे ज्याचे उद्दीष्ट राष्ट्राचे विभाजन करून डेमोग्राफी बदलणे आहे, असा दावाही योगी यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in